श्रीनगर :  Chandgam in Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांने कारवाई तीव्र केली. आज पुलवामामध्ये (Pulwama) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम  (Chandgam ) भागात लष्कराच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 


एक पाकिस्तानी दहशतवादी ठार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे पहाटे दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक सुरू झाली, ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले आणि ते सर्व जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की, चंदगाम, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत जैशचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी एक पाकिस्तानचा नागरिक होता.


गुप्तचर माहितीनंतर लष्कराची कारवाई  


पुलवामाच्या चंदगाम भागात दहशतवादी लपल्याची गुप्तचर सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर मध्यरात्री कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या संशयित ठिकाणाला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना बाहेर येण्यास सांगितले, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केला.


सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच


पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात लष्कराचे ऑपरेशन सुरू असून जवान शोध मोहीम राबवत आहेत. कारवाईनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून दोन एम-4 कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफल जप्त केली आहे.


5 दिवसांत 8 दहशतवाद्याचा खात्मा


जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या पाच दिवसांतील ही पाचवी चकमक असून आतापर्यंत 8 दहशतवादी मारले गेले आहेत. यापूर्वी चार चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. 1 जानेवारी रोजी कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. यानंतर तीन जानेवारीला आणि श्रीनगरमध्ये भारतीय जवानांनी लष्कर कमांडर सलीम परेला ठार केले. याशिवाय एक दहशतवादीही मारला गेला. 4 जानेवारीला कुलगाम चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. आता आज  सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.