नवी दिल्ली : होळीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमतींनी किचनचं बजेट कोलमडलं आहे. खाद्य तेलाच्या किंमतींबाबत सरकार देखील आता पाऊले उचलणार आहे. केंद्र सरकारने तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक राज्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. सरकारने तेल उत्पादक, निर्यातदारांसोबतही चर्चा केली आहे.


तेलाच्या वाढत्या किंमतींवर सरकार ऍक्शन मोडमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राने राज्यांना अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच किमतीत कृत्रिम वाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. साठेबाजी आणि किमतीत वाढ करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि जिल्हा स्तरावर पाळत ठेवण्याचे निर्देश त्यांनी राज्यांना दिले.



गेल्या आठवडाभरात रिफाइंडच्या दरात प्रतिलिटर 25 रुपये आणि बदामाच्या किमतीत 20 ते 30 रुपये किलोने वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती येत्या काही दिवसांत नवा उच्चांक गाठू शकतात. 


गेल्या महिन्यात देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती 25-40 टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले


रशिया-युक्रेन युद्धामुळे किंमती वाढल्या


रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या पुरवठ्याला तिहेरी धक्का बसला आहे. युक्रेनमधून सूर्यफुलाच्या पुरवठ्यावर दबाव आल्याने इंडोनेशियातील निर्यात धोरणावर आणखी परिणाम झाला आहे. त्यामुळे पामतेल आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय, यामुळे दक्षिण अमेरिकेतील पिकांच्या नुकसानीची चिंता वाढली आहे, ज्यामुळे सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.


येत्या काही दिवसांत दर आणखी वाढणार


अवघ्या महिनाभरात (खाद्य तेलाचे) भाव 125 रुपयांवरून 170-180 रुपयांवर पोहोचले आहेत. मे किंवा जूनमध्ये यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. किमतीत आणखी वाढ होण्याचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असेल. पण ती थोडीशी वाढ नक्कीच होणार नाही