Latest News : एटीएममधून (ATM) पैसे काढल्यानंकर खात्यात नेमकी किती रक्कम शिल्लक राहिली आहे हे तपासण्याची अनेकांचीच सवय असते. असंच काहीसं एका मुलानं केलं. पण, त्यानंतर ते काही घडलं ते पाहून त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ही घटना आहे बिहारच्या मुजफ्फरपूरमधील. जिथं नववी इयत्तेत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाने एटीएममधून 500 रुपये काढले आणि लगेचच त्यानं खात्यात किती रक्कम आहे हेसुद्धा तपासलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे काढल्यानंतर या मुलानं जेव्हा खात्यातील रक्कम पाहिली तेव्हा त्याचा स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. कारण, अचानकच त्याच्या खात्यात एकदोन नव्हे, तब्बल 87 कोटी 65 लाख रुपये इतकी रक्कम दिसत होती. एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहाच्या वृत्तानुसार हा शालेय शाळकरी मुलाने अवघ्या 5 तासांसाठी कोट्यधीश झाला होता. 


नेमका घटनाक्रम... 


मुजफ्फर जिल्ह्यातील सकरा प्रखंडच्या चंदनपट्टीचा मूळ रहिवासी असणाऱ्या सैफ अलीनं काही खासगी कामासाठी सायबर कॅफे गाठलं. इथं त्यानं बँक खात्यातील रक्कम पाहिली तर हा आकडा थेट 87 कोटी 65 लाख इतका दाखवण्यात आलाय हे पाहून सायबर कॅफेतील व्यक्ती आणि खुद्द सैफ अलीसुद्धा हैराण झाले. 


झाला प्रकार सैफनं त्याच्या आईला सांगितला आणि त्यानं बँकेचं Customer Service Point गाठलं. पण, तोपर्यंत मात्र त्याच्या खात्यातून ही संपूर्ण रक्कम दिसेनाही होऊन उरले होते फक्त 532 रुपये. हा सर्व प्रकार पाहता त्यानं खातं बंज करण्याचा निर्णय घेतला खरा. पण, त्याच्या खात्यात पाच तासांसाठी जमलेली ही रक्कम नेमकी कुठून आली आणि कुठे गेली यावरून मात्र अद्याप पडदा उठलेला नाही. 


हेसुद्धा वाचा : बाबासाहेबांवर प्रभाव पाडणारे मार्टिन ल्यूथर किंग होते तरी कोण? 


सदर प्रकरणी उत्तर बिहार ग्रामीण बँकही तपास करत असून, एका शाळकरी मुलाच्या खात्यात इतकी रक्कम आलीच कशी, हा प्रश्न त्यांच्या मनातही घर करताना दिसत आगे. सायबर डीएसपी सीमा देवी यांच्या माहितीनुसार अशी अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली असून, या मुलाच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जात असावा ही शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं.