खासदाराच्या वाहनाने ५ जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू
काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले.
पाटणा : राजकिय पुढाऱ्यांच्या मुजोरीची अजून एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये ही घटना घडली असून काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले.
त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
बिहारच्या सुपोलमधील निर्मली-सिकरहाटा मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा दुर्देवीरित्या अंत झाला.
खा. रंजन या आपल्या ताफ्यासह बेदराकमपणे निर्मली-सिकरहाटा मार्गावरुन निघाल्या होत्या .
त्या वेळी निर्मली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामप्रकाश यादवही यावेळी त्यांच्यासोबत होते. खा. रणजीत रंजन या काँग्रेसच्या खासदार असल्या तरी त्यांचे पती पप्पू यादव हे जन अधिकारी पक्षाचे नेते असून गुन्हेगारी पार्श्वभूमीमूळे ते चर्चेत आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.