Crime News : बिहारच्या (Bihar News) सुपौल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभादरम्यान तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बिहारच्या  (Bihar Crime) सुपौलमध्ये लग्नादरम्यान, वाद इतका वाढला की डीजेवर नाचणाऱ्या एका डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नवरदेवाच्या भावाने या तरुणाची हत्या केली आणि पळ काढला. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला. शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्या करुन आरोपीने काढला पळ


बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. डिजेवर नाचणाऱ्या या तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मरौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुआटोलजवळ बुधवारी रात्री लग्नाच्या वरातीत परवाना नसलेल्या शस्त्राने नवरदेवाच्या 20 वर्षीय भावाने गोळीबार केला. यामध्ये नाचणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने तिथून पळ काढला.


डान्सर सुभाष यादव  2 मे रोजी लग्न असलेल्या गावात डान्स करण्यासाठी गेला होता. तिथे त्याचे नवरदेवाचा लहान भाऊ विपिन कुमार याच्याशी भांडण झाले. सुभाष विपिनच्या आवडीचा डान्स करत नव्हता हे या भांडणाचे कारण होते. त्यावेळी लोकांनी हे मिळून हे भांडण मिटवले. पण आपल्या मनाप्रमाणे डान्स न केल्याचा राग विपिनच्या मनात होता. दुसऱ्या दिवशी 3 मे रोजी सुभाष पुन्हा लग्नात नाचायला गेला. रात्री दहा वाजता तो वरातीत डीजेवर नाचत होते. त्याचवेळी विपिनने त्याच्यावर गोळीबार केला. यात सुभाषचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विपिन दुचाकीवरुन पळून गेला.


"सुभाष ज्या वरातीमध्ये नाचत होता तिथल्या वऱ्हाडींच्या हातात बंदुका होत्या. सुभाषला आम्ही सांगतोय तसे नाच नाहीतर गोळ्या घालू असे सांगितले जात होते. शेवटी नवरदेवाच्या भावाने सुभाषची गोळ्या झाडून हत्या केली," असे सुभाषच्या नातेवाईकांनी सांगितले.


पोलिसांनी काय सांगितले?


हातात बेकायदेशीर शस्त्रे घेऊन वऱ्हाडी नाचतानाचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.


गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. आरोपी लवकरात लवकर सापडतील अशी आशा आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी  राजीव कुमार यांनी दिली


दरम्यान, मंगासिहौल गावातून वऱ्हाडी दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगमा गावात जात होते. त्यावेळी कुआटोलजवळ डीजे बंद केल्यानंतर काही तरुणांनी सुभाषला डान्स करायला सांगितले. तिथे विपिन हातात पिस्तुल घेऊन नाचत होता. त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी मुख्य रस्ता तासभर रोखून धरला हो. मृतदेह रस्त्यावर ठेवून गोंधळ घालणाऱ्या ग्रामस्थांनी मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. मात्र रस्ता अडवल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढली.