Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचवेळी मुलीच्या दोन भावांनी त्याला बघितलं आणि त्यांचा पारा चढला. संतापलेल्या भावांनी धारदार शस्त्रांनी तरुणावर वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते रस्त्याच्या कडेला फेकून दिले. तर त्याची ओळख पटू नये यासाठी त्याचे कपडे जाळून टाकले. तरुणाची हत्या करुन दोनही आरोप फरार झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधल्या दिलावरपूर गावातील एका लग्न समारंभात अभिषेक कुमार नावाचा तरुण आला होता. याच गावात त्याची प्रेयसी रहात होती. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. घरात ही दोघं गप्पा मारत बसले होते, त्याचवेळी तिचे दोन भाऊ घरी आले. त्यांनी या दोघांना पाहिल्यावर त्यांच्या रागाचा पारा चढला त्यांनी बहिणीच्या प्रियकराला मारहाण केली. 


यावेळी ती मुलगी आणि आजीने मध्यस्थी करत तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही भावांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी त्या तरुणाला एका खोलीत नेत आतुन दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने अनेक वार केले. मुलाने आपल्याला सोडण्याची याचना केली पण दोनही भाऊ ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते.


हे ही वाचा : Shraddha Murder Case: आफताबची तिहार जेलमध्ये पहिली रात्र, ब्लँकेट घेऊन आरामात झोपला


आरोपींनी बहिणीच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने अनेक वार केले. या हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही भावांनी त्या तरुणाचे हात-पायाचे तुकडे केले आणि भगवानपूर जवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिले. त्याचे कपडेही जाळून टाकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण हा मुलीच्या भावांचा मित्र होता. त्यांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी जात होता. या दरम्यानच त्याचं आणि मुलीचे प्रेमसंबंध सुरु झाले. 


हे ही वाचा : Pune Crime : कार्यालयातील महिलेवर अत्याचार करत बनवला Video, कोथरूडच्या CA ला बेड्या


हत्येनंतर दोन्ही भाऊ फरार
तरुणाच्या हत्येची बातमी मिळताच पोलीस घटनेस्थळी दाखल झाले. हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, हत्येनंतर मुलीने प्रियकर अभिषेकच्या घरी जाऊन संपूर्ण घटना त्याच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर मृत कुटुंबियांबरोबर जात मुलीने पोलीस स्थानकात आपल्या भावांविरोधात तक्रार दाखल केली. अभिषेकच्या हत्येला आपले दोन्ही भाऊ जबाबदार असल्याचं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही तिने केली आहे.