बिहार निवडणूक २०२० । शिवसेनेला मिळाले `हे` निवडणूक चिन्हं
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला अमान्य होते.
पाटणा : बिहार निवडणुकीत शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला अमान्य होते. अखेर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळाले आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत
बिहार विधानसभा निवडणुकीत आता शिवसेना याच निवडणूक चिन्हाच्या आधारे प्रचार करणार आहे. सत्ताधारी जेडीयूचे निवडणूक चिन्हं हे बाण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्य बाणाला जेडीयूने आक्षेप घेतला होता.
शिवसेनेचे 'हे' २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे बॅट, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी आणि गॅस सिलेंडर यापैकी एक चिन्हं देण्याची मागणी केली होती. पण ही चिन्हं आधीच अन्य उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यावर शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले. पण त्याला आक्षेप घेणारे पत्र शिवसेनेने लिहिल्यावर आता तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं देण्यात आले.