पाटणा : मतमोजणी सुरु असताना निकाल स्पष्ट होण्याच्या दिशेने जातात, पण बिहार विधानसभा निवडणुकीत असं काही होताना दिसत नाहीय. उलट आधी आरजेडी आघाडीवर, नंतर एनडीए आघाडीवर जात असल्याचं चित्र आहे. एनडीएने जरी अचानक मुसंडी मारली असली, तरी काही वेळात पुन्हा आरजेडीसह महागठबंधनच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील चित्र काहीसं बदलतंय. पण अजूनही भाजपा आणि आरजेडीच्या जागांमध्ये १ ते २ सीटचा फरक दिसून येत आहे. मात्र एनडीए महागठबंधनपेक्षा आघाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेडीयूने जेवढी मतांची टक्केवारी मिळवायला हवी होती, तेवढी मिळवलेली दिसत नाही. जेडीयू १५ टक्के मत मिळवली आहेत, तर काँग्रेसने ९ टक्के मत मिळवली आहेत, अर्थात हा सुरुवातीचा ट्रेन्ड आहे. 


एकंदरीत असंच चित्र पुढील अर्धातास अस्थिर राहिलं तर बिहारचा निकाल आणखी धक्कादायक लागू शकतो. एलजेपी देखील किंगमेकर होण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. इतरांची ताकत देखील महत्त्वाची आहे. 


कारण अपक्षांसह इतरांना १८ टक्के मतदान झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे एनडीएच्या ट्रेन्डला जर धक्का बसला, तर बिहारमध्ये कुणाचं सरकार येईल आणि कोण मुख्यमंत्री होईल हे सांगणं कठीण होवू शकतं.

बिहारच्या राजकारणाचा आणि सरकार स्थापनेचा ट्रेन्ड हा महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या ट्रेन्डच्या दिशेने जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. थोडक्यात एवढ्यात कुणीच सांगू शकत नाही की,  बिहारमध्ये एकहाती सत्ता कुणाची येईल. किमान दुपारी १२.३० पर्यंत स्पष्ट होईल की, बिहारमध्ये बाहुबली कोण ठरेल.