नवी दिल्ली : बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. सरकारनं कोरोना नावाचं प्रकरण संपवून टाकलंय. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्यानं संसद अधिवेशन गुंडाळल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना बिहार निवडणूक लढण्याबाबत विचार करेल. बिहार निवडणूक लढवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे २-३ दिवसांत निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये लोकांना फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही असेही राऊतांनी स्पष्ट केले. लालू यादव तुरूंगात असले तरी इस्पितळात आहेत. परिस्थिती योग्य आहे का, हा प्रश्न आहे. बिहारमध्ये जातीपातीवर निवडणूक होते, कृषी किंवा कामगार विधेयकावर होणार नाही. बिहारमधील कोरोना संपला का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


सुशांत सिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतकं राजकारण केलं. कामाचे,विकासाचे मुद्दे नसल्यानं मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जातायत असा टोला राऊतांनी लगावला.  तिथले पोलीस प्रमुख बक्सरमधून लढतायत. जे नाट्य लिहले गेलंय त्यानुसार पुढं जातंय. मारूती कांबळेचे काय झालं त्याप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे काय झालं, असं विचारावं लागेल असे राऊतांनी म्हटलं. 



एनसीबीचे जे काम हे आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणारे ड्रग्ज रोखण्यासाठी आहे. पण हे एकेका व्यक्तीला बोलवलं जातंय. देशात फिल्म उद्योग वाढत असेल तर स्वागत आहे. इथला ऐषोराम सोडून कुणी जाणार नाहीत. इथून कुणी जाणार नाही. उलट काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभारली पाहिजे असे ते म्हणाले. 


व्यसनं कोणत्या क्षेत्रात नाहीत ? काहींना पैशाचे व्यसन असते. मुंबईचे वलय अजिबात कमी होणार नाही. मुंबादेवीचे महत्व कमी होणार नाही. कितीही कार्यालये हलवली तरी ही मुंबई झळाळणार असे राऊत म्हणाले. कंगना प्रकरणात माझी काहीच बाजू नाही. आम्ही फक्त भूमिका जाहीर केल्याचे ते म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस सध्या राष्ट्रीय प्रश्न समजून घेतायत, बहुतेक ते राष्ट्रीय राजकारणात जातील असेही ते म्हणाले.