पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला. या प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप बाजी मारणार का की तरुण नेतृत्व तेजस्वी यादव काय चमत्कार करणार याची मोठी उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील पहिल्या टप्प्यातील उद्याच्या मतदानात आठ मंत्र्यांसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात भाजपचे चार आणि जेडीयूचे चार मंत्री आहेत. या दिग्गज उमेदवारांसमोर आव्हान असणारे विरोधक आणि बंडखोर उमेदवारांचे आहे. त्यामुळे उद्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढाई होणा आहे.


सत्ताधारी भाजप आणि जेडीयू विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत आहेत तर वाढती महागाई, बेरोजगारी आणि अशा विविध समस्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रचारदरम्यान लक्ष केले आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


मुंगेरमधील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रचार थंडावला आहे. त्यानंतर आता २७ ऑक्टोबरपासून केंद्रीय सुरक्षा दलासह सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी दाखल झाले आहेत. तीन विधानसभा मतदार संघातील १४०२ मतदान केंद्रांवर उद्या मतदानाला सुरुवात होईल. यानंतर २८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तारापूर, मुंगेर आणि जमालपूर विधानसभेत जिल्ह्यातील सर्व ९,६८,७८५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.


जिल्हाधिकारी राजेश मीना यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुंगेरमध्ये ५, तारापूरमध्येमध्ये ५ आणि जमालपूरमध्ये ४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचवेळी १४ प्रकरणांमध्ये सात प्रकरणांत कोविड -१९बाबत नियम न पाळल्याने हे गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.