सोन्याची खाण असलेलं हे राज्य सत्य परिस्थितीत मात्र `गरीब`
कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण, भरभरून सोनं असलेलं राज्य वास्तवात आहे फारच गरीब
नवी दिल्ली : सध्या सोन्याचे दर अस्थिर आहेत. पण देशात असं एक राज्य आहे, जेथे सोन्याची खाण आहे. सोन्याची खाण असलेल्या राज्याचं नाव आहे बिहार. बिहार व्यतिरिक्त कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये सोन्याची खाण आहे. बिहारमध्ये देशातील जवळपास 42 टक्के सोनं आहे. पण इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे सोने उत्खननाचे काम सुरू आहे, तसं बिहारमध्ये नाही. बिहारमध्ये देशातील सर्वात जास्त समोर असल्याचं सांगितलं जात आहे.
जेवढं सोनं बिहारकडे आहे, त्याप्रमाणे देशातील कोणत्याचं राज्यात सोन्याची खाण नाही. पण तरीही बिहारचा गरीब राज्यांमध्ये समावेश होतो. गया, राजगीर आणि जमुईमध्ये सोन्याचा भांडार आहे. केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी राज्य सभेत सांगितलं की नॅशनल मिनरल इंव्हेटरी डेटानुसार देशात 501.83 मिलियन टन सोन्याचा भांडार आहे.
केंद्र सरकराने दिलेल्या माहितीनुसार देशातील 42.21 टक्के सोनं एकट्या बिहारमध्ये आहे. म्हणजे बिहारमध्ये 222.8 मिलियन टन सोनं आहे. अधिक सोन असलेल्या बिहारनंतर दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. कर्नाटकमध्ये 103 मिलियन टन सोनं आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये तीन टक्के सोनं आहे. तर आंध्र प्रदेशात 3 टक्के आणि झारखंडमध्ये 2 टक्के सोनं आहे.