Bihar mob on Suspected thief : भारतात गेल्या 7 वर्षांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चोरीच्या घटनांची संख्या देखील जास्त आहे. एखादा चोर चोरी करताना जर घावला तर त्याची सुट्टीच नाही. एखादा चोर चोरी करताना पकडला गेला तर लोकांकडून जबर मार तर बसणारच.. पण बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका संशयित चोराला पकडल्यावर लोकांनी त्याला किळसवाणी शिक्षा दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये एका तरुणाला काही लोकांनी पकडलं अन् त्याचे हात बांधले. हा तरुण चोरी करण्यासाठी आला होता, असा आरोप लोकांनी केला आहे. त्यावेळी लोकांनी संशयित चोराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर टाकली. त्यावेळी संशयित चोर वेदनेने आरडाओरड करत होता. तरी देखील लोकांना दयामाया आली नाही आणि लोकांनी त्याचा मारहाण देखील केली. तरुणाला केवळ संशयाच्या आधारे लोकांनी पकडलं होतं.


पोलिसांना माहिती देण्याऐवजी काही लोकांनी कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. आधी तरूणाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर टाकली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओ व्हायरल होताच बिहार पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. बिहार पोलिस मुख्यालयाने अररिया पोलिसांना सोशल मीडियावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी मोहम्मदला अटक केली.


दरम्यान, हे प्रकरण अररिया पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. चोरीच्या आरोपात पकडलेल्या तरुणासोबत हे अमानवी कृत्य करण्यात आलं. उपरोक्त कृत्य करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतरांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अररिया पोलिसांनी सोशल मीडियावर दिली आहे.