बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! नितीश कुमार यांचा भाजपाला धक्का
महाराष्ट्रात राजकीय सत्तापालट झाल्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंप
Bihar Political Crisis : महाराष्ट्रात राजकीय सत्तापालट झाल्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. (bihar cm nitish kumar ends alliance with bjp)
बिहारमध्ये (Bihar) जेडीयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. मात्र, जेडीयूकडून औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
नितीश कुमार हे भाजपसोबतची युती तोडून राजद (RJD) सोबत सत्ता स्थापन करु शकतात. नितीश कुमार राजद, काँग्रेस आणि डाव्यांसह नवीन सरकार बनवू शकतात.