`गणपती` लिहिणार कॉमर्सचे पेपर
पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?
पाटणा : पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर? हा धक्कादायक प्रकार घडला आहे बिहारच्या ललीत नारायण मिथीला विद्यापीठामध्ये घडला आहे.
कृष्णकुमार राव या एफवाय बीकॉमला शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर त्याच्या स्वत:च्या फोटोऐवजी गणपतीचा फोटो लावण्यात आला होता. कृष्णकुमार हा नेहेराच्या जेएन कॉलेजचा विद्यार्थी आहे.
हॉल तिकीटावर गणपतीचा फोटो आल्यामुळे धावपळ करावी लागली तसंच मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया कृष्णकुमारनं दिली आहे. ४ ऑक्टोबरपासून सुरु होणारी परीक्षा कृष्णकुमारला देता आली पण यासाठी त्याला कागदपत्र द्यावी लागली.
या सगळ्या घोळाबाबत विद्यापीठानं मात्र हात झटकून घेतले आहेत. गणपतीचा फोटो लावण्यामध्ये विद्यापीठाची चूक नाही. तर विद्यार्थ्यानं सायबर कॅफेमध्ये जाऊन भरलेल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये गणपतीचा फोटो लावला, अशी प्रतिक्रिया विद्यापीठानं दिली आहे.