मुंबई : या जगात दररोज रस्ते अपघात हे होत असतात. काही खूप भयानक असतात, तर काही किरकोळ अपघात असतात. जेव्हा या घटनांचे व्हिडीओ समोर येतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. सध्या अशाच एक बाईकच्या अ‍ॅक्सिडंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेत एका दुचाकीला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली आहे. कार ओव्हरटेक घेत असताना तिच्य़ा रस्त्यात एक कार आणि बाईक आली, तेव्हा स्पिड मॅनेज करताना या भरधाव कारने एका बाईकला टक्कर दिली ज्यामुळे त्याच्या बाईकचा चुरा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढे होऊनही हा कार वाला क्षणभर देखील थांबला नाही किंवा त्याने हे पाहाणे सुद्धा गरजेचे समजले नाही की तो व्यक्ती जिवंत आहे की, नाही ते? 


त्याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना तामिळनाडूची असल्याचे सांगितले जात आहे. येथील सालेम जिल्ह्यातील महामार्गावर दुचाकीवरुन दोन तरुण कल्लाकुरीची येथून त्यांच्या मूळ गावी पलानीकडे जात होते. परंतु यावेळी मागून येणाऱ्या भरधाव कारमुळे यांना जोरदार टक्कर दिली. या कारची टक्कर इतकी जोरदार होती की, त्यांच्या दुचाकीची तुकडे झाले आणि त्यात एका व्यक्तीचा जिव गेला आहे.


हा अपघातात झालेल्या तरुणांची नावे अजित आणि अरुण आहेत. कल्लाकुरीची येथील अजित हा मित्र अरुणसोबत पलानीहून आपल्या गावी परत जात होता. परंतु कारने त्यांच्या दुचाकीला सालेम-कोयंबतूर महामार्गावर जोरदार धडक दिली. ही घटना तेथून जात असलेल्या दुसऱ्या कारमध्ये असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, रस्त्यावर सर्व काही सामान्य होते, परंतु नंतर एक वेगवान कार मागून आली आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिने बाईकला धडक दिली.


बाईकला कार धडकताच बाईक उडून पडली आणि त्याबाईकवर असलेल्या तरुणांपैकी दोन्ही तरुण रस्त्यावर पडले. यातील एक तरुण बेशुद्ध झाला आहे, तर दुसरा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे.



या अपघातानंतर तेथील उपस्थित लोकांनी त्यांना मदत करण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर लोकांनी दोन्ही तरुणांना जवळच्या रुग्णालयात नेले. सध्या पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.