नवी दिल्ली : दुर्घटनेत दुखापत होऊ नये म्हणून आणि अपघाताची तीव्रता कमी व्हावी यासाठी बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट महत्वाचं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ न्यायालयाने सांगितले म्हणून नाही तर, सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट फार महत्वाचं आहे आणि हेल्मेट परिधान करायलाच हवं.


विचित्र अपघात


मात्र, जयपूरमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातासंदर्भात ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण, हेल्मेटमुळे एका बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.


५० हजार रुपयांचं हेल्मेट


न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जयपूरमध्ये राहणाऱ्या रोहित सिंह शेखावत याने २२ लाखांची निंजा झेडेक्स १० आर चालवत होता. यावेळी त्याने तब्बल ५० हजार रुपयांचं हेल्मेटही परिधान केलं होतं.


असा झाला अपघात


बुधवारी सायंकाळी रोहित आपलं काम संपवून राजापार्कहून न्यू लाईट कॉलनी येथे जाण्यासाटी निघाला. त्यावेळी जेएलएन मार्गावर डब्ल्यूटीपीसमोर दोन युवक रस्ता क्रॉस करत होते. दोघांनाही बाईकच्या स्पीडचा अंदाज आला नाही आणि बाईकची धडक दोघांना लागली.


ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू 


अपघातानंतर रोहित दूरवर फेकला गेला. त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याच्या डोक्यातील हेल्मेट न निघाल्याने फुफ्फुसात रक्त जमा झालं आणि ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. 


डॉक्टरांनी त्याच्या डोक्यातील हेल्मेट कापून काढलं. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. रस्ता क्रॉस करणारा अखिलेशही अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.