Viral Video :  सोशल मीडियाच्या जगाने आजच्या तरुण पिढीला वेड लावलं आहे. सोशल मीडिया प्रसिद्ध होण्यासाठी काही तरुण जीवाची पण परवा करत नाही. आपल्या व्हिडीओला सर्वाधिक लाइक आणि कमेंट्स मिळावे म्हणून खतरनाक स्टंट करतात. सोशल मीडियावर असे धक्कादायक स्टंटचे व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. अनेक तरुणांना स्टंट करताना खूप मजा येते. मात्र यात जीव जाऊ शकतो हे त्यांचा तेव्हा लक्षात येतं नाही. 


नजर हटी दुर्घटना घटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एका तरुणाचा बाईकचा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालील जमीन सरकेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या काही मित्रांसोबत रस्त्याच्या कडेला स्टंट करत असतो. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहताना या मुलासोबत काही दुर्घटना घडेल असं वाटत नाही. हा तरुण बाईक गोल-गोल फिरवत असतो तेवढ्यात त्याचा बाईकच्या स्पीड वाढतो आणि तो रस्त्याच्या मधोमध जातो. त्यावेळीला रस्त्यावरून येणाऱ्या ट्रकला जाऊन तो धडकतो. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. या दुर्घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असणार यात शंका नाही. 


तरुणांना वाटतं असे स्टंटकडून ते इतरांचे लक्ष वेधतात. स्टंट करताना ते एकदम हँडसम आणि डॅशिंग दिसतात असं त्यांना वाटतं. पण असे जीवघेणे स्टंट करुन आपण आपला जीव धोक्यात घालतो आहोत, हे त्यांचा लक्षात येत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील ट्विटरवर Indra Choudhary Gathala या नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1.30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.