`बाईक टॅक्सी` चालकाने मित्रासह मिळवून तरूणीसोबत केलं लाजीरवाण कृत्य
तिने `बाईक टॅक्सी` (Bike Taxi Driver) बुक केली होती. या बाईक टॅक्सीवाल्याने (Bike Taxi Driver) तिचा फायदा उचलण्याच ठरवलं. यासाठी `बाईक टॅक्सी`वाल्याने तिला एकाकी ठिकाणी नेले.
देशात खाजगी प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या खाजगी सर्विसेसमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत 'बाईक टॅक्सी' चालकाने
(Bike Taxi Driver) मित्रासह मिळून तरूणीसोबत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलय.
घटनाक्रम काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित 22 वर्षीय तरूणी ही केरळची रहिवासी आहे. ती त्या रात्री आपल्या एका मित्राच्या घरातून दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. यासाठी तिने 'बाईक टॅक्सी' (Bike Taxi Driver) बुक केली होती. या बाईक टॅक्सीवाल्याने (Bike Taxi Driver) तिचा फायदा उचलण्याच ठरवलं. यासाठी 'बाईक टॅक्सी'वाल्याने तिला एकाकी ठिकाणी नेले. याठिकाणी त्याने त्याच्या एका मित्रालाही बोलावले होते. आणि नंतर मिळून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता.
तेव्हा तिला कळालं बलात्कार झालाय
ज्यावेळेस पिडीतेने 'बाईक टॅक्सी' (Bike Taxi Driver) बुक केली होती. त्यावेळेस ती शुद्ध हरपली होती. याचाच फायदा घेत चालकाने आणि मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता.यानंतर तिला सोडून दिले. पिडीता तिच्या मित्राकडे गेली. मात्र त्यांना तिन तिच्यासोबत बलात्कार झाल्याची काहीच माहिती दिली नाही. याउलट दुसऱ्या दिवशी तिला दुखायला लागल्यानंतर ती रूग्णालयात गेली होती. यावेळी तिला तिचा बलात्कार झाल्याचे कळाले होते.
बलात्काराच्या घटनते महिलेचा सहभाग
बाईक टॅक्सी' (Bike Taxi Driver) चालक आणि मित्रांच्या या बलात्कार प्रकरणात एका महिलेनेही त्यांना मदत केली होती. ही महिला आरोपी चालकाची मैत्रिण होती. हे आरोपी पिडीतेला इलेक्ट्रॉनिक सिटीतील एका रूममध्ये घेऊन गेले. याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
आरोपीला असा लावला शोध
पोलिसांनी बाईक टॅक्सी (Bike Taxi Driver) अॅपद्वारे आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच इतर आरोपींच्या मागावर पोलिस आहेत.
बंगळूरूत ही घटना घडली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. तसेच बाईक टॅक्सी (Bike Taxi Driver) चालकासह या घटनेत आणखीण कोणत्या आरोपींचा सहभाग सुरू होता याचा तपास सुरु आहे.