Crime News : घर फोडून पैसे चोरल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. एक अशी चोरी समोर आली आहे ज्यामध्ये चोरी करणाऱ्या तरूणाचे वडील करोडपती निघाले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल करोडपती बापाच्या मुलाला अशी काय गरज होती की त्याला चोरी करावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नक्की प्रकरण?
गाडीची चोरी करणाऱ्या चोराला पकडल्यावर समोर आलं की त्याने याआधी सात गाड्या चोरल्या होत्या. पोलिसांनी सर्व वाहनं जप्त केली आहेत. गौरव असं आरोपी चोराचं नाव आहे. तपासात समोर आलं की, गाड्यांचे अॅलॉय व्हील विकून आपलं व्यसन पूर्ण करत होता. 


गौरवचे वडील करोडपती असल्याचं त्याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं. गौरवने फक्त चोरीच नाहीच तर एका कारखान्यामध्येही व्यसन पूर्ण करण्यासाठी काम करत होता. गौरव व्यसनपूर्ण करण्यासाठी चाके उघडून अलॉय व्हील्स काढून घेत बाजारामध्ये विकत होता. सिहानी गेट, कवीनगर आणि मेरठमध्ये या परिसरामध्ये चोऱ्या केल्या होत्या. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधील आहे.


यावरून लक्षात येतं की आजची तरूणाई व्यसनाच्या किती आधीन गेली आहे. तरूणांनी व्यसनापासून दूर रहायला पाहिजे असं वारंवार आवाहन करण्यात येतं मात्र आजची तरूण पीढी जात असल्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.