मुंबई : Bike Care In Rainy Season | पाऊस सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत मोटारसायकलने प्रवास करणाऱ्यांना प्रवासादरम्यान कधीही पावसाचा सामना करावा लागू शकतो, पावसामुळे ओल्या वाटेवरून चालावे लागू शकते, तसेच रस्त्यांवरील खड्डेदेखील सांभाळावे लागतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात तुमची बाईक तुम्हाला अनेकदा धुवावी लागते. एकीकडे पावसाचे पाणी आणि दुसरीकडे बाईक पुन्हा पुन्हा धुवावी लागते. या दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला बाईक बंद पडण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परंतू हा त्रासही तुम्ही टाळू शकता. 


जेव्हा तुम्ही बाईक धुता तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये म्हणजेच सायलेन्सरमध्ये पाणी जाणार नाही. त्यात पाणी गेल्यास दुचाकी सुरू होण्यास त्रास होतो. ते सुरू करण्यासाठी तुम्हाला वारंवार किक मारावी लागेल. अशावेळी सायलेन्सरमधील पाणी सुकल्यावरच बाईक सुरू होईल. 


चावीच्या लॉकमध्ये पाणी गेल्यास, लॉक उघडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे चावी लॉकमध्येही पाणी जाऊ नये याची काळजी घ्या. 


पावसाळ्यात रस्ते पाण्याने तुडुंब भरतात. पाणी जास्त तुंबलेलं वाटत असेल तर, तेथून जाऊ नका. अन्यथा बाईक बंद पडू शकते. ज्यामुळे तुम्ही पाण्यात अडकू शकता.