`या` पोलिसाने बाइकवाल्याला थांबवलं कारण ऐकून तुम्हाला `सुखदधक्का` बसेल
`हा` व्हीडिओपाहून तुम्हाला वाटेल पोलिसांनी तुम्हाला पुन्हापुन्हा या कारणासाठी थांबवावं...
नवी दिल्ली : बाइक भरधाव वेगात चालवत असताना जर एखाद्या पोलिसाने आपल्याला थांबण्याचा इशारा केला, की आपण तिथून पळवाट काढतो. पण प्रत्येकवेळी पोलिस आपल्याकडून पावती फाडतील अशातली गोष्ट नसते. तर कधी असं देखील होवू शकतं की पोलिसांना भरधाव वेगात बाइक चालावणाऱ्यांची गरज भासू शकते. असंच काही झालं आहे तामिळनडूमध्ये. सध्या तामिळनाडूतील एका बाइकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये बाइकर आणि पोलीस कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेची ज्या प्रकारे मदत केली आहे, ती खरचं प्रचंड कौतुकास्पद आहे. बाईकर आणि पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध महिलेला केलेली मदत माणुकसीचा उत्तम दाखला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हीडिओमध्ये पोलीस कर्मचारी एका बाइकरला थांबवतो आणि त्याला सांगतो.. पुढे एक बस गेली आहे. बसमध्ये प्रवास करत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या औषधांची बाटली खाली पडते. पोलीस औषधांची बाटली पोलीस उचलतात आणि बाइकरला त्या बसचा पाठलाग करून औषधं महिलेपर्यंत पोहोचवण्यास सांगतात.
बाईकर देखील दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडतो. हा व्हीडिओला आतापर्यंत 7.43 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. बाइकर यूट्यूबर असल्याचं सांगण्यात येत आहे. हा बाइकर कायम गरजूंच्या मदतीला धावून येतो.