Bill Gates On PM Modi And India Progress: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अब्जाधीश तसेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेतली. बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच्या भेटीबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये एक सविस्तर लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी भारतामधील कोव्हीड-19 व्यवस्थापन, लसीकरण मोहीम, भारतामधील संशोधन आणि डिजिटल विश्वासंदर्भातील उल्लेख करत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी आपला अधिकृत ब्लॉग 'गेट्सनोट्स'वर हायलाइटमध्ये ही पोस्ट शेअर करताना, "भारताचं सुरक्षित, प्रभावी आणि सक्तीच्या लसीकरण निर्मितीसंदर्भातील कामासाठी कौतुक केलं पाहिजे," असं म्हटलं आहे. भारतामधील लसींमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवता आले. भारतामधील लसीकरणामुळे कोव्हीड-19 साथीच्या दरम्यान इतर अनेक आजारांवरही नियंत्रण मिळवण्यास फायदा झाल्याचं गेट्स यांनी म्हटलं आहे.


भारतामध्ये आर्थिक समावेशाला प्राथमिकता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गेट्सनोट्स'नुसार, को-वीनने एका ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोव्हीडच्या लसींचे 2.2 बिलियनहून अधिक डोस वितरित केले. गेट्स यांनी, "पंतप्रधान मोदींचं म्हणणं आहे की को-वीन जगासाठी एक आदर्श मॉडेल आहे. या मॉडेलशी मी सहमत आहे," असंही म्हटलं आहे. गेट्स यांनी साथीच्या कालावधीमध्ये डिजिटल पेमेंटचा मार्ग स्वीकारल्याबद्दल भारताचं कौतुक केलं आहे. 200 मिलियन महिलांसहीत कमीत कमी 300 मलियन महिलांना आप्तकालीन स्थितीमध्ये डिजिटल माध्यमातून देवाण-घेवाण करण्याचा मार्ग उपलब्ध करुन दिला. "भारतामध्ये आर्थिक समावेशाला प्राथमिकता देण्यात आलेली आहे. डिजिटल आयडी सिस्टीममध्ये भारताने गुंतवणूक केली आहे. तसेच डिजिटल बँकिंगसाठी त्यांनी उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे," असंही गेट्स म्हणाले. 


भारताच्या जी-20 अध्यक्षतेचाही केला उल्लेख


गेट्स यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षता या गोष्टीला अधोरेखित करण्याची एक उत्तम संधी आहे की कशाप्रकारे या देशाने एक विकसित संशोधनाला जगभरामध्ये पोहचवलं आणि त्याचा लाभ इतरांना मिळवून दिला, याबद्दल भाष्य केलं आहे. इतर देशांना तो स्वीकारण्यासाठी भारताने कशी मदत केली याचाही उल्लेख केला आहे. भारताच्या या सर्व प्रयत्नांचं समर्थन करणं, खास करुन डिजिटल आयडी आणि पेमेंट प्रणाली इतर ठिकाणी वापरण्यासाठी पुढाकार देणं हे आमच्या फाऊंडेशनची उच्च प्राधान्यक्रमावर असेल, असं गेट्स म्हणाले.



भारताबद्दल गेट्स आशावादी


ब्लॉगच्या शेवटी गेट्स यांनी, "आरोग्य, विकास आणि जलवायू वाहतुकीमध्ये भारताच्या प्रगतीबद्दल मी फारच आशावादी आहे. भारत देश हा आपण संशोधनामध्ये गुंतवणूक केल्यास काय होईल हे दाखवणारा प्रदेश आहे. भारत प्रगतीपथावरील ही वाटचाल सुरु ठेवले आणि जगाबरोबर हे यश शेअर करेल अशी अपेक्षा आहे," असंही म्हटलं आहे.