नवी दिल्ली : जगभरात अनेक खाण्या-पिण्याच्या गोष्टी आहेत. काही सामान्य असतात, त्याबाबत सर्वांनाच माहिती असते. परंतु काही गोष्टी अशाही असतात, ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. अशाच प्रकारचं एक मशरुम (Mushroom) आहे, ज्याबाबत अनेकांना माहिती नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे प्रोटीनयुक्त मशरुमचा (Protein) अनेक जण आपल्या डाएटमध्ये  (Diet) समावेश करतात. जगभरात अनेक प्रकारचे मशरुम आढळतात. मशरुमचा एक असा प्रकार आहे, ज्यात रात्रीच्या वेळी प्रकाश पडतो. 


गोव्यात आढळतो हा दुर्लभ मशरुम -


हा दुर्लभ मशरुम बायो-ल्यूमिनिसेंट  (Bio Luminiscent)नावाने ओळखला जातो. रात्रीच्या वेळी चमकणारा, प्रकाश पडणारा हा मशरुम गोव्याच्या (Goa)जंगलांमध्ये आढळतो. गोव्याच्या म्हाडेई वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये  (Mhadei Wildlife Sanctuary) हा मशरुम आढळला आहे. या जागेला मोलेम नॅशनल पार्क किंवा महावीर वाईल्डलाईफ सेंच्युरी म्हणूनही ओळखलं जातं. या मशरुमची खास बाब म्हणजे, हा दिवसा सामान्य किंवा इतर मशरुमप्रमाणे दिसतो. परंतु रात्री यातून प्रकाश पडतो. वन्यजीव विशेषज्ञ मशरुमच्या या प्रजातीला मायसेना जीनस  (Mysena Genus) असं म्हणतात.


हे मशरुम केवळ पावसाच्या दिवसात आढळतात. वैज्ञानिकांना आतापर्यंत चमकणाऱ्या, प्रकाश पाडणाऱ्या मशरुमच्या 50 प्रजातींबाबत माहिती मिळाली आहे.