नवी दिल्ली : मोदी सरकार संपूर्ण देशामध्ये डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार आता विमानाची बोर्डिंग प्रक्रिया संपूर्णपणे पेपरलेस करण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत भारतीय विमानातून कुठूनही प्रवास करण्यासाठी फक्त मोबाईल फोन जवळ असणे आवश्यक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तपत्राने म्हटले आहे की, नागरी उड्डान मंत्रालय विमान कंपन्या आणि विमानतळावरचा डेटाबेस प्रवाश्याच्या आयडीशी जोडणार आहे. यामध्ये आधार आणि पासपोर्ट क्रमांक जोडला जावू शकतो. उड्डान मंत्रालयाचे सचिव आर. एन. चोबे यांनी माहिती दिली की, एकदा हे सुरु झाल्यानंतर पॅसेंजर बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर स्वत:ची आयडिन्टी सिद्ध करण्यासाठी करु शकेल. त्यांना वेगळे आयडी कार्ड दाखविण्याची आवश्यकता नाही. नंतर तिकिटे किंवा ई-तिकीट दाखवण्याची देखील आवश्यकता नसणार आहे. कारण डेटाबेसनेच तिकीट बुक झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपनीला कळेल.


लिंक डेटाबेसमुळे जेव्हा एखादा प्रवासी बोर्डिंग गेटवरुन जाईल तेव्हा लक्षात येईल की त्याने आधी सेक्युरीटी चेक-इन केले की नाही.