अगरतळा : त्रिपुरामध्ये आज तब्बल २५ वर्षानंतर सत्तांतर झालंय. आज इथे भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. भाजपचे बिल्पब देव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रातले बडे मंत्री शपथविधीला उपस्थित होते. त्रिपुरात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालय. स्थानिक पक्ष आयपीएफटीच्या साथीनं भाजपनं हे बहुमत साधलंय. त्यामुळे यापक्षाचे आमदाराही मंत्रिमंडळात सामील झाले.




जीष्णू देबबर्मा हे बिल्पब देब यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. शपथविधीला भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे इथेही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय.