मुंबई : कोरोना (Coronavirus) अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशभरात आता बर्ड फ्लूनं (Bird flu crisis) थैमान घालत आहे. आतापर्यंत तीन ते चार हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. नव्या संकटाने पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी मेलेल्या पक्ष्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. यावरुन हे संकट आहे बर्ड फ्लूचे (Bird flu) आहे, हे आता स्पष्ट होत आहे. आता कुठे भारत कोरोनातून थोडा मोकळा श्वास घेत असताना नवे संकट आले आहे. एकीकडे कोरोनाच्या लस देण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नवा रोग आक्रमण करायला दबा धरुन बसला आहे. देशभरात बर्डफ्लूचा कहर सुरू झाला आहे. 


देशात 8 राज्यांत बर्ड फ्लूचे थैमान 


भारतातल्या 8 राज्यांमध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातल आहे
हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, हरियाणात बर्ड फ्लू पसरलाय
मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, गुजरातमध्येही बर्ड फ्लूनं पक्षी मेलेत 
हिमाचल प्रदेशात अडीच हजार पक्ष्यांचा मृत्यू 
मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये अडीचशे कावळ्यांचा मृत्यू 
इंदूरमध्ये तीन दिवसांत ५० कावळ्यांचा मृत्यू



हे आकडे धक्कादाय़क आहेत. चक्रावणारे आहेत. बर्ड फ्लू झालेले पक्षी झाडावरुन जमिनीवर पडून मरत आहेत. उडणारे पक्षी अचानक जमिनीवर पडत आहेत. झारखंड,राजस्थान आणि गुजरातमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूनंतर अलर्ट जारी करण्यात आलाय. हा बर्ड फ्लू कावळे, कोंबड्या, कोकिळा, बदकं, परदेशी पक्ष्यांचाही जीव घेतोय. मेलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासल्यावर हा H5N8 बर्ड फ्लू असल्याचं सिद्ध झाले आहे.


ही लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे जा


राजस्थानातल्या नीळकंठ मंदिरासमोर मेलेल्या पक्ष्यांचा खच पडला होता. पीपीई किट घालून त्यांचे मृतदेह उचलण्यात आले. हिमाचल प्रदेशात पौंग तलावाकाठी ९ प्रकारच्या शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. अजून तरी कुठल्या माणसामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळलेली नाहीत.


मात्र तुम्हाला ताप, कफ, खोकला, नाक वाहणं, डोकेदुखी, घशाला सूज, जुलाब, ओटीपोटात दुखणं, श्वास घ्यायला त्रास, डोळ्याला रांजणवाडी अशी लक्षणं असतील तर लगेचच डॉक्टरकडे जा. नव्या आजारापासून सावध राहा, काळजी घ्या.