वर्ष संपत आलं असून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विग्गीने संपूर्ण वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्विग्गीवर एकूण 4.3 लाखांच्या बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तसंच 83.5 लाख नूडल्सच्या ऑर्डर्स होत्या. 19 नोव्हेंबर 2023 ला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप फायनलदरम्यान प्रत्येक मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. स्विग्गीने आपल्या युजर्सकडून ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांसंबंधी डेटा जाहीर केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. 


मुंबईतील युजरने दिली 42.3 लाखांची ऑर्डर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विग्गीवर मुंबईच्या एका युजरने जानेवारी महिन्यापासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत एकूण 42.3 लाखांच्या जेवणाची ऑर्डर दिली आहेत. तर सर्वाधिक ऑर्डर्स चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधील युजर्सच्या अकाऊंटमधून आल्या आहेत. या शहरातील काही युजर्सच्या अकाऊंट्समधून सरासरी 10 हजारांपेक्षा जास्त किंमतीचे फूड डिलिव्हरी ऑर्डर देण्यात आल्या. 


स्विग्गीने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डर देण्यात फक्त मोठ्या शहरांचा समावेश नाही. छोट्या शहरातूनही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. झाशीत एकाच वेळी 269 पदार्थ डिलिव्हरी करण्याची ऑर्डर होती. तर भुवनेश्वर येथे एका घरातून 207 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या घरी कोणतीही पिझ्झा पार्टी नव्हती. 


गुलाबजामून ठरला सर्वात आवडता गोड पदार्थ


भारतीयांना आता रसगुल्लापेक्षा गुलाबजामून अधिक आवडत असल्याचं दिसत आहे. दुर्गापूजेदरम्यान गुलाबजामून डिलिव्हरीसाठी 77 लाख ऑर्डर देण्यात आल्या होत्या. गुलाबजामून व्यतिरिक्त, या 9 दिवसांत मसाला डोसा सर्वात आवडती व्हेज ऑर्डर ठरली.


हैदराबादमधील एका युजरने 2023 मध्ये ईडली ऑर्डर करण्यासाठी 6 लाख रुपये खर्च केले. बंगळुरूमध्ये 85 लाख चॉकलेट केकच्या ऑर्डर देण्यात आल्या. त्यानंतर शहराला केक कॅपिटल ही पदवी देण्यात आली आहे. 2023 मध्ये 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दर मिनिटाला 271 केकची ऑर्डर देण्यात आली. नागपुरातील एका युजरने एकाच दिवसात 72  केक ऑर्डर केले होते.


बिर्याणीला सर्वाधिक मागणी


स्विग्गीनुसार, बिर्याणी सलग 8 व्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी डिश ठरली आहे. 2023 मध्ये प्रत्येक सेकंदाला 2.5 बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. यामधील 5.5 चिकन बिर्याणीवर एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती. 24.9 लाख यूजर्सने तर बिर्याणीच्या ऑर्डरसाठी पहिल्यांदा स्विग्गीवर लॉग इन केलं. 


बिर्याणीची प्रत्येक सहावी ऑर्डर हैदराबादमधून केली जात होती. याच शहरातील एका युजरने 2023 मध्ये एकूण 1633 बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. चंदीगडमध्ये एका कुटुंबाने भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 70 प्लेट बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. या सामन्यादरम्यान स्विग्गीला प्रत्येक मिनिटाला बिर्याणीच्या 250 ऑर्डर मिळाल्या.


डिलिव्हरी करण्यासाठी कापलं 16 कोटी किमी अंतर


स्विग्गीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सनी इलेक्ट्रिक वाहने आणि सायकलद्वारे ऑर्डर पोहोचवण्यासाठी 16 कोटी किलोमीटरचे अंतर कापलं आहे. चेन्नईच्या वेंकटेशनने 10 हाजर 360 ऑर्डर दिल्या. कोचीच्या संथिनीने 6253 ऑर्डर डिलिव्हर केल्या. गुरुग्रामच्या रामजीत सिंगने 9925 ऑर्डर तर परदीप कौरने लुधियानामध्ये 4664 ऑर्डर डिलिव्हर केल्या आहेत.