Biryani Samosa Goes Viral: सोशल मीडिया म्हणजे अल्पावधीमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग समजला जातो. रिल्स असोत, मिम्स असोत किंवा कोणत्याही दैनंदिन वापरातील गोष्टींसंदर्भात केलेले प्रयोग असोत आपली क्रिएटीव्हीटी दाखवण्यासाठी मोफत उपलब्ध असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. त्यातही खाद्यपदार्थांसंदर्भात होणारे रिल्स, व्हिडीओ आणि त्यामधील प्रयोगही विशेष चर्चेत असतात. अनेकदा रेसिपींपासून ते फूड जॉइण्टसंदर्भातील माहिती या कंटेंटमधून मिळते. पण कधीतरी व्हायरल व्हिडीओंमधील नको ती क्रिएटीव्हीटी पाहून तीव्र सनक डोक्यात जातेवाली फिलिंग येते. असाच काहीसा प्रकार सध्या नेटकऱ्यांबरोबर घडला आहे तो बिर्याणी समोसा (Biryani Samosa) पाहून...


तुम्हीच पाहा हा फोटो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर पदार्थाचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल म्हणजे भातात समोसा कुसकरलाय की समोश्यामध्ये बिर्याणी भरली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन. सोशल मीडियावर याच समोश्यामध्ये बटाट्याच्या भाजीचा मसाला भरण्याऐवजी चक्क बिर्याणी भरुन तो तळण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हा बिर्याणी समोसा पाहून अनेकांनी आस्चर्य वाटलं आहे. अनेकांनी बिर्याणी ही समोश्यामध्ये टाकली जाऊ शकते याची आम्ही कल्पनाच केली नव्हती अशा उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अगदीच मोजक्या लोकांना हा प्रयोग पसंत पडल्याचंही खालील कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. 



26 मार्च रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंना 3 लाख 66 हजारांहून अधिक लाईक्स आहेत. 500 हून अधिक वेळा हा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर शेकडोंच्या संख्येनं कमेंट्स नोंदवण्यात आल्या आहेत. एकाने तर असं सारं करायची काय गरज होती असा प्रश्न विचारला आहे.



अन्य एकाने केवळ हेच बघायचं शिल्लक होतं असं म्हटलं आहे.



एका व्यक्तीने 'सरफरोश' चित्रपटामधील गुनाह हैं यह असं म्हणणारं मीम शेअर करत हा अपराध का केला असा प्रश्न विचारला आहे.



मात्र काहींनी याचं कौतुक केलं आहे. एकाने हे पहायला तरी चविष्ट वाटतंय असं म्हटलं आहे.



तुम्हाला या समोश्याबद्दल काय वाटलं हे कमेंट करुन नक्की कळवा. तुम्ही हा बिर्याणी समोसा ट्राय कराल का हे ही नक्की सांगा.