Govt Job: भारतीय मानक ब्यूरोमध्ये बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी
BIS Recruitment 2024: बीआयएस भरतीअंतर्गत असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन ही अनेक पदे भरली जाणार आहेत.
BIS Recruitment 2024: तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीायएसमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेश जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे. बीआयएसमध्ये 325 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत ग्रुप ए, बी आणि सीची पदे भरले जाणार आहेत. यात असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन ही अनेक पदे भरली जाणार आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता ही पदानुसार वेगवेगळी असेल. या पदांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे. असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित फिल्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला स्टेनोग्राफी येणे आवश्यक आहे.यासंदर्भातील सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
कशी होणार उमेदवारांची निवड?
बीआयएस भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया विविध टप्प्यातून होणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेश आणि वैद्यकीय चाचणी हे टप्पे असतील. तुमची निवड निश्चित करण्यासाठी सर्वच टप्प्यांची तयारी करा, असा सल्ला उमेदवारांना देण्यात येतोय.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी 9 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर अर्जाची लिंक 9 सप्टेंबरपासून सक्रीय होईल. तर 30 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहेत. या भरतीद्वारे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या या भरतीद्वारे एकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये महाव्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा, उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा आणि व्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदांनुसार पात्रता आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या भरती अंतर्गत, महाव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-13 नुसार पगार दिला जाणार आहे. हा पगार 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 पर्यत असेल.उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी निवड झालेल्यांना स्तर-12 नुसार पगार दिला जाईल. 78 हजार 800 ते 2 लाख 09 हजार 200 पगार दिला जाईल. व्यवस्थापक (तांत्रिक) या पदासाठी स्तर-11 नुसार पगार दिला जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67 हजार 700 ते 2 लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. NHAI भर्ती 2024 च्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट 'डीजीएस (एचआर/अॅडमिन)-3, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारत सरकार, प्लॉट नंबर जी 5, 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075' या पत्त्यावर पाठवावी लागणार आहे. NHAI च्या या रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.