बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
मुंबई : बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण, या व्हर्च्युअल करन्सीबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) इशारा दिला आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे हे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
काय म्हणतेय आरबीआय?
आरबीआयने म्हटले आहे की, 'गेल्या काही काळापासून व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ आणि इनिशियल कॉईन ऑफरिंग (ICO) यांच्यात मोठी वृद्ध झाली आहे. ही वृद्धी पाहून आम्हाला चिंता वाटते. महत्त्वाचे असे की, बिटकॉईन हा रिझर्व्ह बँक निर्धारीत करत नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून बिटकॉईनचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या तो 11,000 डॉलरवर पोहोचला आहे.' 24 डिसेंबर 2013लाही आरबाआयने म्हटले होते की, 'व्हर्च्युअल करन्सीला वास्तवात कोणताही आधार नाही. तसेच, याची बाजारपेठेतील किंमत ही केवळ अंदाज आणि काही ठोकताळ्यांवर अधारीत असते. यापूर्वीही व्हर्च्युअल करन्सीमध्ये अनेक चढ-उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आम्ही सतर्कतेचा इशारा देत आहोत', असेही आरबीआयने म्हटले आहे.
कायदेशीर सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
आरबीआयने यापूर्वी अनेकदा बिटकॉइनबाबत चिंता व्यक्त केली आहे. 2013 मध्येही आरबीआयने सांगितले होते की, व्हर्च्युअल करन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना संभाव्य गुंतवणुकीसाठी कोणत्याही प्रकारे कायदेशीर सुरक्षा नाही. त्यामुळे ही गुंतवणूक धोकादायक ठरू शकते. आम्ही गेल्या काही काळापासून बिटकॉईनवर विचार करतो आहोत. तरीही आम्हाला वाटते की, सद्यस्थितीत तरी ही करन्सी आम्हाला योग्य वाटत नाही.
बिटकॉईनला कायदेशीर आधार नाही
रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले होते की, 'पेमेंटसाठी बिटकॉनसह कोणत्याही प्रकारची व्हर्च्युअल करन्सीची निर्मिती, देवाण-घेवाण आणि वापर कोणत्याही प्रकारे केंद्रीय बँक अथवा सरकारककडून अधिकृत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे हा व्यवहार कायदेशीर नाही. व्हर्च्युअल करन्सीसाठी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वॉलेट्सचा वापर केला जातो. जे सहजपणे हॅक केले जाऊ शकते. यात पासवर्डची चोरी, विश्वासघात, फसवणूक अशा घटना घडू शकतात त्यामुळे असे व्यवहार करताना काळजी घ्या', असेही आरबीआयने म्हटले आहे.