नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे बघायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक ज्वेलर्सकडील खरेदी वाढल्याने सोन्याचे भाव ५० रूपयांची वाढले आहेत. त्यामुळे आता सोन्याचे भाव ३०२५० रूपये प्रति ग्रॅमवर येऊन धडकले आहेत. पण चांदीचे भाव कायम आहेत. 


लग्नामुळे सोन्याचे मागणी वाढली


व्यापा-यांचं म्हणनं आहे की, स्थानिक बाजारात लग्नाच्या सीझनमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळेच किंमतीत ही वाढ झाली आहे. वैश्विक स्तरावर सिंगापुरमध्ये सोनं १२७४.८० सरासरी प्रति डॉलर स्तरावर आहे. 


दिल्लीतील सोन्याचे भाव


देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोनं ५० रूपयांनी महागलं आहे. ते क्रमश: ३०२५० रुपये आणि ३०१०० रूपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत ३०० रूपयांची घट झाली होती. 


चांदीचे भाव स्थिर


सोन्याचे भाव वाढले असताना चांदीचे भाव स्थिर आहेत. ३९००० प्रति किलोग्रॅम इतके चांदीचे भाव आहेत. चांदीच्या नाण्यांचा भाव ७३००० रूपये लिलाव आणि ७४००० इतका विक्री भाव आहे.