Man Marries Mother In Law In Front Of Father In Law: बिहारमधील बांकेमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भात समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं कसं घडू शकतं असा प्रश्न या घटनेसंदर्भात ऐकल्यानंतर प्रत्येकाला पडला आहे. अनेकांनी हा सारा प्रकार समाजिक दृष्ट्या नैतिकतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणारा असल्याचं म्हटलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं घडलं तरी काय? तर बिहारमध्ये चक्क एका जावायचं त्याच्या सासूबरोबर लग्न लावून देण्यात आलं आहे. हो! हे खरं आहे.


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांके येथे एका जावयाचं त्याच्याच सासूबरोबर प्रेमप्रकरण सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांच्या प्रेमप्रकरणासंदर्भात घरातील व्यक्तींना समजलं आणि त्यानंतर घरच्यांनीच या दोघांचं लग्न लावून दिल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. छत्तरपाल पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या हिरा मोती गावात ही घटना घडली आहे. सध्या ही विचित्र घटना पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


कोण आहेत हे दोघे?


समोर आलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय दिलेश्वर दर्वे नावाच्या व्यक्तीची 45 वर्षीय पत्नी गिता देवीचं तिचा जावई सिकंदर यादवबरोबर प्रेमप्रकरण सुरु होतं. पत्नीचं निधन झाल्यानंतर सिकंदर त्याच्या सासरीच राहत होता. याच कालावधीमध्ये गिता आणि सिकंदर या दोघांमधील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले.


पतीला संशय आला अन्...


मात्र दिलेश्वर यांना या नात्याची भनक लागली. दिलेश्वर यांना फार पूर्वीपासूनच आपली पत्नी गिता आणि जावयाचं प्रेमप्रकरण सुरु असल्याची शंका होती. दिलेश्वर यांनी या दोघांनाही याची कल्पना न देता स्वत:च्या वैयक्तिक स्तरावर याचा माग घेण्यास सुरुवात केली. दिलेश्वर यांची शंका खरी ठरली आणि त्यांनी पत्नीला जावयाबरोबर रंगेहाथ पकडलं. यासंदर्भात दिलेश्वर यांनी पंचायतीला माहिती दिली. सिंकदरनेही जाहीरपणे आपलं सासू गिताबरोबर प्रेमप्रकरण सुरु असल्याचं मान्य केलं. त्याने पंचायतीचे पाच पंच आणि जमलेल्या गावकऱ्यांसमोर ही कबुली दिली. त्यानंतर दिलेश्वरने गिताचं लग्न जावयाशी लावून देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दिलेश्वरने पंचांना कल्पना दिली आणि गाकवऱ्यांची संमती घेऊन सर्वांसमोर सिकंदरने गिताच्या माथ्यावर सिंदूर लावत पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला.



या साऱ्या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.