नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. प्रथमच पक्षाचे खासदार आणि आमदारही या बैठकीत सहभागी झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत पुढील पाच महिने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचा अॅक्शन प्लॅन ठरवला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि 2019 लोकसभा निवडणुकीची दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत. असे मानले जाते की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी धोरणात्मक घोषणा करू शकतात. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणाने बैठकीची सुरुवात झाली तर सांगता नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे.


आज दिवसभर भाजपच्या जवळपास २ हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढच्या दीड वर्षांसाठी पक्षाच्या वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी मंथन सुरु आहे. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं बैठकीचा समारोप होणार आहे.