COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : राहुल गांधींचं अधिवेशनातलं भाषण हे पराभूत मानसिकतेतून होतं, अशी टीका भाजपनं केलीय. कॉंग्रेसच्या ८४ व्या राष्ट्रीय अधिवेशनात कॉंग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावर भाजपाने आपली प्रतिक्रीया दिली आहे.


चुकीची माहिती दिली 


राहुल गांधींनी भाषणात अतिशय चुकीची माहिती दिली, खोटं बोल पण रेटून बोल, असाच राहुल गांधींचा आविर्भाव होता, अशी टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलीय. 


तर 'सौ चुहे खाके बिल्ली हजको चली', अशा शब्दांत प्रकाश जावडेकरांनी टीका केलीय. 


काय म्हणाले राहुल गांधी ?


 मोदी हे नाव भ्रष्टाचाराचं चिन्ह असून एका मोदीने दुसऱ्या मोदीला पळून जायला मदत केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 


पंतप्रधान मोदी मुद्द्यांपासून भटकतात. मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी ते सर्जिकल स्ट्राईक, फॅन्सी योगा, नोटबंदी यांच्यासारखे मुद्दे पुढे करतात. 


देशात विकास होतो आहे तर, मगो लोकांना रोजगार का मिळत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.