दिल्लीत भाजपकडून `पकोडे पे चर्चा`
पीएम मोदी यांच्या भज्जांचा उल्लेख असणाऱ्या वक्तव्याची काँग्रेस आणि इतर विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी दिल्ली भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
नवी दिल्ली : पीएम मोदी यांच्या भज्जांचा उल्लेख असणाऱ्या वक्तव्याची काँग्रेस आणि इतर विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी दिल्ली भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
'पकोडे पे चर्चा'
भाजपने पकोडे पे चर्चा अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं की, आज पूर्ण दिल्लीमध्ये पकोडे पे चर्चा केली जाणार आहे. आम आदमी पक्षाला देखील यातून ते उत्तर देणार आहेत.
विरोधकांना उत्तर
मनोज तिवारींचं मत आहे की, विरोधकांच्या टीकेत मोदी सरकारवर विश्वास लोकांचा कमी होऊ नये. यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप संपूर्ण दिल्लीमध्ये आज भज्जी पार्टीचं आयोजन करणार आहे. पदार्थ्यांच्या गाड्या लावणारे, चहा वाले, भज्जी वाले यामध्ये सहभागी होतील. यामध्ये भाजप नेते यांच्या सोबत चर्चा करतील. मनोज तिवारी यांच्या व्यतिरीक्त दिल्लीतील सर्व भाजप नेते यात सहभागी होणार आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजन
भाजपची सर्व १४ जिल्ह्यांमध्ये पकोडा पार्टीचं आयोजन करण्याची योजना आहे. दिल्लीमध्ये जर ही पकोडा पार्टी यशस्वी झाली तर संपूर्ण देशामध्ये याचं आयोजन केलं जाईल.