नवी दिल्ली : भाजपविरोधी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली  १६ विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने  पाठ  फिरवली आहे. दरम्यान, यूपीएतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाचे खासदार उपस्थित राहिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं आव्हान पेलण्यासाठी रणनीती ठरवण्याकरता १६ विरोधी पक्षांची नवी दिल्लीत बैठक झाली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र पाठ फिरवल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात. याउलट नुकत्याच एनडीएच्या तंबूत गेलेल्या संयुक्त जनता दलाचे खासदार अली अन्वर अन्सारी मात्र या बैठकीला हजर होते. 


तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, माकपाचे सीताराम येच्युरी हे पश्चिम बंगालमधले कट्टर विरोधकही या बैठकीसाठी एका छताखाली आले. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना त्यांची रणनीतीही बदलावी लागणार असल्याचं येच्युरी यांनी या बैठकीनंतर सांगितले.


 मात्र गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी एक मत वाटून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची या बैठकीमधली अनुपस्थिती चर्चाचा विषय होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी दुटप्पी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.