राज्यसभेत भाजप क्रमांक एक, तरीही बहुमतापासून दूरच...
राज्यसभेत भाजप भलेही जिंकली असेल पण, भाजपच्या चिंतेत सातत्याने भरच पडत आहे. कारण, एनडीएतील मित्रपक्ष तेलगू देशमने भाजपची साथ सोडली आहे.
नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी लागला. निकालानुसार भाजपच्या राज्यसभेतील जागा नक्कीच वाढल्या. पण, असे असले तरी, बुहमताच्या आकड्यापासून भाजप अद्यापही दूरच आहे. एकूण ५८ जागांपैकी २८ जागा भाजप, कँग्रेस दहा जागा जिंकल्या. यात निकालामुळे २४५ सदस्यांच्या या सभागृहात ५८ वरून वाढ होत ६९ जागा मिळवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर, ५४ जागांवरून घसरण होत काँग्रेस ५० जागांवर पोहोचला. असे असले तरी, भाजप आणि त्यांचे सहकारी पक्षांसाठी (एनडीए) बहुमताच्या आकड्याने चकवा दिला.
सख्याबळ वाढले तरी, भाजपची चिंता कायम
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या ११ जागा वाढल्या. तर, काँग्रेसने चार जागा गमावल्या. निवडणुक झालेल्या १४ जागांवर यापुर्वी काँग्रेसचे प्रभुत्व होते. पुढील आठवड्यात नव्या सदस्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, राज्यसभेत भाजप भलेही जिंकली असेल पण, भाजपच्या चिंतेत सातत्याने भरच पडत आहे. कारण, एनडीएतील मित्रपक्ष तेलगू देशमने भाजपची साथ सोडली आहे. गेली चार वर्षे तेलगु देशम भाजपसोबत सत्तेत होता. राज्यसभेत तेलगू देशमचे ६ सदस्या आहेत.
विरोधी पक्षांचे प्रमाण प्रचंड घटले
दरम्यान, या निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या समाजवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ कमालीचे घटले आहे. त्यामुले भाजपच्या गोटात भलतेच उत्साहाचे वातावरण आहे. समाजवादी पक्षाला या निवडणुकीत केवळ एकच जागा मिळाली. या आधी निवडणुक झालेल्या या जागांवर समाजवादी पक्षाचे सहा सदस्य होते. दरम्यान, लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. मात्र, राज्यसभेत भाजपला पूर्ण बहुमत नाही. असे असले तरी, पुर्वीपेक्षा भाजपचे संख्याबळ वाढल्यामुले भाजप सध्या आनंदात आहे.