शिवसेना-भाजपाच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब
शिवसेनेला विरोधी बाकांवर जागा - प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता समीकरणांमुळे अखेर आज सेना-भाजपतील युती तुटलीय. शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा आज भाजपनं केली. संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रात ते काँग्रेसशी जुळवण्याचा प्रयत्न त्यामुळे त्यांना विरोधी बाकांवर जागा देण्यात येत आहे, असं प्रल्हाद जोशी म्हणालेत.
यापूर्वी, सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं रविवारी एनडीएची एक बैठक आयोजित केली. उल्लेखनीय म्हणजे, या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज भाजपानं शिवसेनेशी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलंय.