भोपाळ : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्य प्रदेशातील नेते गोपाल भार्गव यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाल भार्गव यांनी म्हटलं की, एक्झिट पोलमध्ये हे संकेत आहेत की, राज्यातील कमलनाथ सरकारने जनतेचा विश्वास गमवला आहे. त्यामुळे विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यात यावं.' यासाठी ते राज्यपालाना पत्र देखील लिहिणार आहेत. भार्गव यांनी म्हटलं की, 'विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी अविश्वास ठराव मांडण्यात यावा.  काँग्रेसकडे दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा आहे. भाजपला सत्ता हवी असती तर त्यांनी इतर आमदार फोडून सत्ता मिळवली असती. पण भाजपने तसं नाही केलं. मला वाटतं की आता लवकरच सत्ताधारी पक्षाला जावं लागेल.'



मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. ज्यामध्ये काँग्रेसकडे 114 आणि भाजपकडे 109 जागा आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसला बसपा, सपा आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 


मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९ जागा आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.