नवी दिल्ली : मकर संक्रांती आणि पोंगलच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा आणि केरळ दौऱ्यावर होते. येथे त्यांना अनेक योजनांना हिरवा कंदिल दिला. विकासाच्या मुद्द्यावर वोट मागण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी मिशन ओडिशा आणि मिशन केरळ हे मोदी सरकारचं पुढचं लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी या दोन्ही राज्यांसाठी अनेक गोष्टींची घोषणा केली. मोदींसाठी ओडिशा आणि केरळ असे राज्य आहेत तेथे भाजपला कधी यश मिळालेलं नाही. पण आता मोदी येथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाच्या रणनीतीमध्ये या दोन्ही राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच आलं आहे. गेल्या ३ आठवड्यात पंतप्रधान मोदींचा हा तिसरा ओडिशा दौरा आहे. तर केरळमध्ये देखील हा त्यांचा तिसरा दौरा होता. मोदी कोल्लमला २०१५ मध्ये आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांच्या प्रतिमेचं त्यांना अनावरण केलं होतं. यानंतर २०१६ मध्ये त्यांनी केरळचा दौरा केला होता.


सध्या केरळमध्ये सबरीमाला मंदिरावरुन वाद सुरु आहे. त्यात मोदींना या दौऱ्यामुळे तेथे चर्चा सुरु झाल्या आहेत. सबरीमाला मंदिराच्या वादावरुन भाजप आणि लेफ्ट सरकार समोरा-समोर आले आहेत. सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या निर्णयानंतर सीपीआयएमचे नेते ए.एन.शमसीरसह अनेक नेत्यांच्या घरावर हल्ला झाला होता. दुसरीकडे भाजपचे खासदार मुरलीधरन यांच्यासह भाजप आणि आरएसएसच्या अनेक नेत्यांच्या घरावर देखील हल्ला झाला आहे. केरळ सरकार भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा छळ करत असल्य़ाचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणावर सगळ्यांच्या नजरा लागून होत्या.


पंतप्रधान मोदींनी कोल्लमधील रॅलीमध्ये लेफ्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'केरळमधील लेफ्ट सरकारचा व्यवहार हा दुर्भाग्यपूर्ण आहे. कम्युनिस्ट भारताचा इतिहास, संस्कृतीचा सन्मान करत नाहीत. पण कोणी कल्पना देखील केली नसेल की कम्युनिस्टांचा त्याच्यावर इतका राग देखील आहे.'