Bihar News: भाजप (BJP) नेते आणि बिहारचे (Bihar) माजी मंत्री सध्या एका समस्येने चांगलेच त्रस्त झाले आहे. ते रहात असलेल्या बंगल्यात दररोज विषारी साप आढळत आहेत. भाजप नेता जीवेश मिश्रा (Jivesh Mishra) यांच्या घरात आतापर्यंत 8 ते 10 साप (Snake) आढळले असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सरकारी बंगल्यात साप आढळण्याला महाआघाडी सरकार जबाबदार असल्याचं जीवेश मिश्रा यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि महाआघाडीतील सहयोगी पक्षांमध्ये दररोज या ना त्या कारणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता जीवेश मिश्रा यांच्या आरोपाने त्यात भर पडली आहे. आपल्या निवासस्थानी साप आढळत असल्याने जीवेश मिश्रा सध्या वैतागले आहेत. 


गेल्या काही दिवसात जीवेश मिश्रा यांच्या निवासस्थानी किंग कोबरा (king cobra) सारखे विषारी सापही आढळून आले आहेत. घराच्या आवारातच नाहीत तर घराच्या आत आणि कार्यालयातही साप दिसले आहेत. 


विषारी साप आढळत असल्याने जीवेश मिश्रा यांनी महाआघाडी सरकारचा हा कट असल्याचं म्हटलं आहे. पण अर्थात त्यांनी हे वाक्य गमतीशीरपण केलं आहे. यापुढे जाऊन त्यांनी भाजपवाल्यांना साप काही करत नाहीत असंही गमतीने म्हटलंय.


गेल्या काही दिवसात जीवेश मिश्रा यांच्या बंगल्यात आठ ते दहा साप आढळून आले आहेत. पण विशेष म्हणजे सापांनी घरातल्या कोणालाही चावा घेतलेला नाही. अनेकवेळा सर्पमित्रांना बोलवून त्या सापांना जंगलात सोडून देण्यात आलं आहे. यासंदर्भात जीवेश मिश्रा यांनी सरकारकडे विनंतीही केली आहे, पण त्यांच्या विनंतीवर अजून कोणतीही कारवाई करणअयात आलेली नसल्याचं जीवेश मिश्रा यांनी सांगितलं.