बेळगावमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाल आज हाती येतोय. भाजप अथवा काँग्रेस कोणत्याच पक्षाला अद्याप बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये.
बेळगाव : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाल आज हाती येतोय. भाजप अथवा काँग्रेस कोणत्याच पक्षाला अद्याप बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय. दरम्यान कर्नाटकच्या या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेसाठी चर्चेचा विषय होता तो म्हणजे बेळगावात कोण जिंकणार. बेळगावच्या हाती आलेल्या निकालानुसार १८ पैकी १० जागांवर भाजपने विजय मिळवलाय तर ८ जागांवर काँग्रेस विजयी ठरलीये. महाराष्ट्र एकीकरण आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये.
विजयी उमेदवार
बेळगाव दक्षिण- अभय पाटील (भाजप) विजयी
बेळगाव उत्तर - अनिल बेनके( भाजप) विजयी
बेळगाव ग्रामीण- लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) विजयी
खानापूर- अंजली निबालकर (काँग्रेस)विजयी
निपाणी- शशिकला जोल्ले(भाजप) विजयी
चिक्कोडी सदलगा- गणेश हुक्केरी (काँग्रेस) विजयी
गोकाक- रमेश जारकीहोळी (काँग्रेस ) विजयी
अरभावी- भालचंद्र जारकेवळी (भाजप)विजयी
हुक्केरी . उमेश कत्ती( भाजप) विजयी
रायबाग- दुर्योधन ऐहोळे (भाजप) विजयी
कुडची- पी राजू ( भाजप) वियजी
कागवाड- श्रीमंत पाटील(काँग्रेस) विजयी
अथणी- महेश कुमटळी( काँग्रेस) विजयी
यमकनमर्डी- सतीश जारकिहोळी (काँग्रेस) विजयी
कित्तुर- महानतेश दौडगौडर (भाजप) विजयी
बैलहोंगल- महानतेश कौझलगी (काँग्रेस) विजयी
सौंदती- आनंद मामाणी (भाजप) विजयी
रामदुर्ग- महादेव यादवाड(भाजप) विजयी