नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या चौथ्या वर्षपूर्ती म्हणजेच २६ मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेचं उद्घाटन करणार आहेत. तसेच एनसीआरला मोठी शपथ देणार आहेत. कुंडलीपासून पलवलपर्यंत गाझियाबादच्या रस्त्यावर जाणारा ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे १३५ कि.मी लांब आहे. या एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचे अंतर खूप कमी म्हणजे जवळजवळ अर्धे होणार आहे. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर सात इंटरचेंज आहेत. ज्याद्वारे एकातून दुसऱ्या शहरात जाता येऊ शकते. २९ एप्रिलला याच उद्घाटन होणार होतं पण याची तारीख पुढे ढकलण्यात आली. 


पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 


 पीएम मोदी २६ मेला भारतातील पहिला १४ लेनचा दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रोड शो करुन करणार आहेत. दिल्ली मेरठ हायवेचा पहिला टप्पा निजामुद्दीनपासून यूपी गेटपर्यंत आहे.