नवी दिल्ली : Narayan Rane on Maharashtra Government : पुन्हा एकदा भाजपने महाराष्ट्रात आपले सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. आतापर्यंत भाजपकडून तीनवेळा हा दावा करण्यात आला होता. मात्र, तसे काही घडलेले नाही. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं विधान केले आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केले आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार असल्याचे राणेंनी म्हटले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असे राणे म्हणाले. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाँना उधाण आले आहे.


दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक


दरम्यान, दिल्लीत बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत संघटनात्मक बदलावर चर्चा सुरु आहे, असे सांगण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांची एक तास चर्चा झाली. राज्यातील येत्या महापालिका निवडणूका आणि राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा सुरु आहे.