नवी दिल्ली : डेटा चोरीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटलेला असताना आज भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आज एका नव्या वादात अडकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित मालवीय यांनी काल ट्विटरवर कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर करून टाकल्या. १२ मे रोजी मतदान आणि १८ मे रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा मालवीय यांनी निवडणूक आयोगानं घोषणा करण्याआधीच करून टाकली. 



 



वाद वाढल्यानंतर मालवीय यांनी आपलं ट्विट डिलीट करून टाकलं. झी न्यूजशी बोलतानाही यावर काही बोलण्यास मालवीय यांनी नकार दिला.  


यामुळे, निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच कर्नाटक निवडणुकीचा कार्यक्रम भाजपला कळला होता की काय? असा सवाल निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. त्यावर तारखा फुटल्या असतील तर कठोर कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं.