Gujarat: भाजपने मुलांसाठी बाजारात आणलं खास चॉकलेट, रॅपरवर PM मोदींचा फोटो
भाजप संसदीय पक्षाच्या भाजप खासदारांनी खास टोपी घातली होती. यासोबतच खासदारांना एनर्जी बूस्टर चॉकलेट्सही देण्यात आली
गुजरात : भाजपने (BJP) गरीब आणि कुपोषित मुलांसाठी पोषक तत्वांनी युक्त असे खास चॉकलेट बाजारात आणलं आहे. कुपोषित मुलांसाठी तयार केलेल्या चॉकलेटचे नमुने मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी खासदारांना देण्यात आली. विशेष म्हणजे चॉकलेटच्या रॅपरवर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं चित्रही छापण्यात आलं आहे.
या एनर्जी बारमध्ये कोणती पोषक तत्व आहेत याची माहितीही रॅपवर देण्यात आली आहे. भाजपचे खासदार दुष्यंत सिंग यांनी हे चॉकलेट खातानाचा फोटो शेअर केला आहे. गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी हे चॉकलेट बाजारात आणलं आहे.
गरीब आणि कुपोषित मुलांसाठी पोषक तत्व असलेलं असं हे चॉकलेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.
खासदारांना खास टोपीचं वाटप
दुसरीकडे भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी भाजपाच्या सर्व मंत्री आणि खासदारांना एक खास टोपी वाटण्यात आली. चार राज्यांच्या विजयानंतर अहमदाबादमधील रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींनी घातलेली हीच टोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही टोपी गुजरातमध्ये तयार करण्यात आली आहे.