नवी दिल्ली :  महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत केली आहे. उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीच्या त्रासामुळे मनस्ताप भोगणाऱ्यांसाठी पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी राजभर यांनी केली आहे. लोकसभेत शून्य मिनिटांच्या कालावधीत राजभर यांनी पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन केला पाहिजे. असे सांगताच सभागृहातील अनेकांना हसू आवरता आले नाही.


या आयोगाला पुरुष आयोग असे नाव देण्यात यावे, असेदेखील ते म्हणाले. सरकारने विविध समुदायांसाठी आयोग स्थापन केले आहेत. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाचीही स्थापना करण्यात आली आहे. पण पुरुषांसाठी कोणताही आयोग नाही, असे राजभर म्हणालेत.