चेन्नई: तामिळनाडूमधील भाजप नेते एच. राजा यांनी न्यायालयाचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी न्यायालय हिंदूविरोधी असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील पुदुकोट्टई जिल्ह्यात गणपतीची मिरवणूक काढण्यात येणार होती. त्यासाठी पोलिसांनी मार्ग ठरवून दिला होता. मात्र, एच.राजा यांना दुसऱ्या मार्गावरून ही मिरवणूक न्यायची होती. परंतु, पोलिसांनी त्याला नकार दिला. त्यावेळी एच.राजा यांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. तेव्हा एच.राजा यांनी पोलिसांना म्हटले की, तुम्ही हिंदूविरोधी आणि भ्रष्ट आहात. तेव्हा पोलिसांनी हा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. तेव्हा एच. राजा यांनी उच्च न्यायालयावरही टीका केली. 


एच. राजा यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी त्यांनी त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर पेरियार यांचा पुतळा तोडण्याचे आवाहन केले होते.