श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात लष्कराच्या ऑलआऊट ऑपरेशनमुळे दहशतीत असलेले दहशतवादी आता अपहरण करत आहेत. जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचं अपहरण केलं आहे. मेहराजुद्दीन मल्ला हे सोपोरमध्ये म्युनिसिपल कमेटीचे उपाध्यक्ष आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहराजुद्दीन मल्ला याचं काल रात्री उपहरण करण्यात आलं. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष शेख वसीम बारी यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांचे वडील आणि भाऊ यांचा देखील मृत्यू झाला होता.


भाजप नेते ंमनझूर अहमद भट्ट यांनी महत्त्वाच्या भाजप नेत्यांना सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.