नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव हे सोशल मीडियावर भलतेच ट्रोल झाले आहेत. महाभारतात महत्त्वाची ठरलेली व्यक्तीरेखा द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.


काय म्हटले राम माधव यांनी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम माधव यांचे वक्तव्य सोशल मीडियावर अनेकाना विचित्र वाटले. काहींनी माधव यांच्या बाजूने प्रतिक्रीया दिली आहे. तर, काहींनी त्यावर तीव्र शब्दांत टीकाही केली आहे. महाभारतात द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख आहे. महाभारतातील उल्लेखानुसार द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार माधव यांनी द्रौपदीच्या पात्राबद्दल म्हटले होते की, 'द्रौपदीचे पाच पती होते. त्यांच्यापैकी ती कोणाचेच ऐकत नसे. ती पहिली फेमिनिस्ट होती. ती केवळ भगवान श्रीकृष्णाचेच ऐकत असे. जे तिचे मित्र होते.'  








द्रौपदीमुळे घडले महाभारत


राम माधव यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रीया उमटल्या. अनेकांनी मत व्यक्त केले की, द्रौपदीला जबरदस्तीने पाच लोकांसोबत लग्न करावे लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव हे पणजी येथे आयोजित कार्यक्रमात (इंडिक फेस्टिव्हल) बोलत होते. माधव यांनी असेही म्हटले की, महाभारत घडण्यासठी द्रौपदी ही प्रमुख कारण होती. पुढे ते म्हणाले की, महाभारतात 18 लाखांहून अधिक लोक मारले गेले. त्या सर्वांच्या मृत्यूस द्रौपदीच कारणीभूत होती. या वक्तव्यासोबतच त्यांनी द्रौपदीला हट्टी असेही म्हटले.